Saturday, April 10, 2010
Change in the mindset!
Saturday, January 23, 2010
Entrepreneurship at the Grass root level
Sunday, January 17, 2010
शोध सुप्त गुणांचा!
काही दिवस तरी एकटे राहावे..!
गेले काही दिवस या विषयावर लिहेन म्हणत होतो.. माझे मत आहे कि माणसाने काही दिवस तरी एकटे राहावे, आपण बरेच काही शिकतो, आपला जीवना कडे पाहण्याच्या दृष्टीकोन बदलतो ..
आमचे छोटे.मध्यम वर्गीय कुटुंब ,.म्हणजे मी, आई ,वडील, आणि माझी धाकटी बहिण. लहानाचा मोठा झालो..ते पुण्यातच..त्यामुळे कधीही शिक्षणा निमित व नंतर नोकरी निमित्त घराबाहेर राहायचा प्रसंग कधी आलाच नाही.. शिक्षण झाल्यावर लवकरच एका माहिती तंत्रद्यान कंपनी मध्ये नोकरी लागली ..( मराठी मधमवर्गीय भाषेत..चिकटलो..). तेंव्हा कंपनी प्रशिक्षणा करिता.काही दिवस एका दुसर्या शहरात पाठवले होते..त्यामुळे तसे पहिला गेले तर ..या आधी काही महिने मी घर बाहेर राहिलो होतो..पण त्या दिवसात ..नुकताच..महाविद्यालय बाहेर पडलो असल्या मुळे तसा थोडा अल्लड पना होता..आणि..कंपनी ने राहण्या खाण्याच्या सगळ्या सुविधा यथायोग्य पुरवल्याअसल्या मुळे फारशी काही चिंता न्हवती. कंपनी चे ऑफिस पुण्यात असल्यामुळे, प्रशिक्षणा संपवून लवकरच मी परत परत पुण्या भूमी मध्ये दाखल.झालो. त्यानंतर पुढे ३-४ एक वर्षे पुण्यात कपनी च्या ऑफिस मधेच होतो. कामात तोच तोच पण येऊ लागला होता. मन काही तरी बदला ची मागणी करत होते आणि त्याच सुमारास माझा परदेश गमनाच्या योग आला. कामा निमित्त कंपनी ने परदेशी पाठवायचे ठरवले ..आणि..आम्ही पुन्हा एकदा ..आपली पुण्या नागरी सोडली..
ऐथे आल्यावर काही दिवस ..नवीन वातावरणाशी जुळून घेण्यात गेले. लवकरच.प्रत्यक्ष परीशितीशी सामना झाला..आम्ही कायम घरी राहत असल्यामुळे ..घरच्यांनी खूप लाडात वाढवलं..त्यमुळे कधी स्वपान्घरात जायचा प्रसंग खाण्या पलीकडे आला न्हवता. अहो मी कधी साधा एक कप चहा करून घाय्चों नाही,..न्हावे यायचा नाही, आपलं भूक लागेली कि सांगायचा अवकाश ....सगळा कस अगदी जागेवर मिळायचं..पण खरच..आणि ऐथे आल्यावर .भूक लागली कि ..आई कशी प्रेमाने ..तव्यावरची गरम गरम पोळी ताटात वाढायची, आईच्या हातची आपली आवडीची भाजी, माऊ शिरा, लुसलुशीत पुरण पोळी, चमचमीत पाव भाजी, सात्विक वरण भात आणि तूप... ..असे प्रसंग झ्र्रकन डोळ्या पुढून जात. काही ना करता आयते मिळाले कि तेंव्हा त्याची किंमंत कळत नाही, म्हणतात ना तेच खरे, ह्याची मला पहिल्या काही दिवसातच प्रकर्षाने जाणीव झाली. निघताना मी काही तरी तुडूक मुदुक स्वयंपाक करयचे नुस्के पाहून निघालो होतो...कणिक मळणे, दाल तांदुळाचा कूकर लावणे असली प्रत्याशिके झाली होती,.पण निघण्याच्या बाकी सगळ्या गडबडीत डोक्यात ते किती घुसले..ते परमेश्वरालाच ठावूक. नुसते..उ-TUBE पाहून ..किव्हा ..स्वयापाकावरील..पुस्तके, किव्हा संजीव कपूर चे कार्यक्रम पाहून स्वयंपाक येत काही, होत नाही. पाण्यात पडल्या शिवाय जसे पोहता येत नाही तसेच मी पण मुद्पक खाण्यात शिरून .. हळू हळू ..एक एक पदार्थ बनावयाचा प्रयत्न करू लागलो, शिकलो..आणि बनवू लागलो..पहिले काही प्रयोग भाज्या वर केले..( पता कोबी, घेवडा इ. इ. ) .बरोबर अनुभवी मित्र, फोने वरून आई, आणि नेट वरील माहिती ..यांच्या मदतीने ..स्वयंपाक शिकण्यास मदत झाली. आणि मी थोडा फार स्वयंपाक बनवू लागलो, अगदी..आमटी भात पोळी भाजी, असा चौव्रस... आपण काही नवीन वस्तू बनवतो , त्याची मजा, तो आनंद काही औरच असतो. आणि विशेषतः
स्वयंपाक हि अशी गोष्ट आहे ..कि जिथे आपल्या कष्टा नचे लगेच चीज होते आणि हो लेगेच ते चाखायला हि मिळते !
मनुष्य एकटे राहू लागला कि .अजून मला जाणवलेला एक बदल म्हणजे..आपण स्वावलंबी बनू लागतो....आपण जेंव्हा घरी असतो..तेंव्हा अनेक गोष्टींची आपल्याला पोच पण नसते ...पण घराबाहेर पडले..कि आपल्याला आपली स्वतःची सगळी सोय पहावी लागते....पुण्यात असताना..मी घरी संधाकली पोचल्यावर ..काय खावे ..ऐथून विचार सुरु करायचो..पण बाहेर असताना..सर्व गोष्टींचे नियोजन आधी पासून कार्याची सवय लालावे लागते..जर कुठली भाजी करायची असेल..तर त्या करिता लागणारे सामानाची व्यवस्था आधी पासून लावले लागते.. मी पूर्वी बरेचदा आमच्या कोपर्यावरच्या रस्त्यावरून वरून संधाकली उगाच फिरत असे..घरी आम्ही "सांगकामे" म्हणून प्रसिद्ध, 'बेकरी मधून ब्रेंड घेवून ये'..अशी आज्ञा मातोश्री कडून झाली ..कि आम्ही दुचाकी वरून शीळ घालत ..फक्त ब्रेंड आणणार,.बस काम संपले . त्याच्या शेजारीच भाजी वाल्या मावशी बसत, पण मला कधी..भाजी व्याल्या मावशीकडची भाजी ताजी दिसली नाही..कि घरी दुध संपले आहे कि नाही ह्याचा आम्ही कधी होशोब ठेवला नाही, पण ऐथे..मोठ्या माल मध्ये गेल्या वर ..बाजूची मुलगी जरी सुंदर दिसली..तरी ..आता आधी आम्ही..ताजी भाजी कुठली आहे..दुधाचे कॅन १ घ्यावा कि २. ह्या कडे लक्ष अधिक लक्ष दुउ लागलो. रूम वर कुठेले समान संपले आहे,.काय आणणे गरजेचे आहे..धुण्याचा साबण संपला आहे ..का?..या आठवड्यात कुठले कपडे इस्त्री करे लागणार आहे.,.या वेळेस कोणाचे पराठे खायला आणायचे, वीजबिल भरायची तारीख कधी, रूम ची सफाई कधी करायची, .अश्या सर्व गोष्टींची खबर कायम ठेउ लागलो . अश्या प्रसंगामधून घर सांभाळणे, त्याचे नियोजन, आणि व्यवस्थापन आपल्या घरात आपली आई बाबा घरात किती यथायोग्य करत असतात.ह्याचा साक्षात्कार होतो . मग आपणहि हळू हळू घरातील लागणाऱ्या सर्व बाबींचा, गोष्टीचा विचार करू लागतो, त्या प्रमाणे थोडे जवब्दारीने वागू लागतो ......आणि .....आपल्याला स्वतःलाच..थोडी समाज आल्यासारखे..वाटू लागते..त्याचे थोडे समाधान पण वाटते..पण या सगळ्या मागच्या मुल मुद्दा आहे..कि ..परीशितीशी जुळवून घेवून आपण स्वावलंबी होऊ लागतो,.योग्य आणि .आणि स्वताचे निर्णय स्वतः घेवू लागतो.. ..जरी काही प्रसंगी ते चुकले तरी त्यातून शिकण्यास मदतच होते..
अजून एक प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ,मनाचा आवाज ..आपण जेंव्हा आपल्या कुटुंब,..मित्र , आपल्या समाजात वावरत असतो....आपण एका कोशात गुंतातेलो असतो..एका दैनंदिन जीवनाचा पट्टा आपण चालवत असतो. मला अशी वाटते ..कि ..आपल्या मनात..खूप आत ..एक दडलेला आवाज असतो..पण दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये ..तो पुरा दडपला जातो..माझ्या मते आपले एक बाह्य मन असते..आणि एका अंतर मन असते ..बाह्य मन..कि ..ज्याच्यशी आपाला सतत सवांद चालू असतो....आणि जे अंतर्मन असते..जे सुप्त अवस्थेत असते. ह्या अन्न्तारिक मनात खूप प्रचंड ताकद असते..जर हे मन आपण जागृत करू शकलो..त्याचाशी सवांद साधू शकलो तर..भल्या भली मोठी कामे आपल्या कडून होऊ शकतात..कित्क्येक थोर माणसे हे सांगून गेली आहेत..कि मनाची अंतरी शक्ती खूप महत्वाची असते..आणि त्या जोरावर..आपण जग पादाक्रांत करू शकतो.....परंतु हे जे आंतरिक मन असते..ह्याच्या आपल्या धाक धाकीच्या जीवनात..सवांद साधायला सवड होत नाही...परंतु मला असे जाणवले कि जेंव्हा आपण असे दूर देशात आपण अपोक एकटे होऊन जातो...तेंव्हा .आपोआप ..आपले अंतरी मनाशी आपण सवांद साधू लागतो..ती उर्जा आपल्याला बल देते, मार्गदर्शन करते. कदाचीत..योग, कुंडलिनी..जप, तप, या सर्व साधने मध्ये ..मन एकाग्र..करून शांत करून, करतात ते हाच एकांत मिळवण्या साठी..कि ज्यात .न्हेवून..आपल्या आंतरिक मनाशी/शक्तीची ..सवांद साधण्याचा प्रयत्न केला जातो......एकटा राहिल्यामुळे मी ..अपसुख हा एकांत मिळायचा अनुभव मी घेतालाल आहे..मग अपोआप..जीवनाची कोडी आपोआप सुतू लागतात..आणि निखळ आनंद कशात हा केवळ बाहेरील जगात/ भौतिक सुखात नसून..तो आंतरिक मनाच्या समाधानावर आहे..हे पटू लागते.!
मी कधी जन्मात विचार केला न्हवता...कि मी घराबाहरे राहायला लयाला पासून काही महिनायचा आत छोले, मटार उसळ, शिरा, मिसळ,बिर्याणी , पोळ्या/पुरी ..आणि हो चहा .(जवळ पास अमृता तुल्य मध्ये मिलतो तसा ) बनवू शकेन..मला ऐथे माझे कौतुक करयचे नसून,.मला जाणवलेली गोष्ट म्हणजे....कि आपण नवीन नवीन गोष्टी .शोधाल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजे ,.आणि त्या प्रय त न पूर्वक आत्मसात करायची धड पण अंगी बाण वाली पाहिजे..आपल्या प्रय्तेकाच्या अंगी अनेक सुप्त गुण असतात.परंतु आपण आपण एकाला चलो रे मार्ग पकडून बसतो. तसे ना करिता नवीन नवीन गोष्ठी..करयचा पर्यंत करून ..आपल्याला त्या जमत आहे का.,..आपल्या ला त्यात रस आहे का ..हे पडताळून पहिले पाहिजे आणि ती गोष्टा आत्मसात करायची धडपड सतत ठेवली पाहिजे .
रोज रोज तेच नको रोज रोज तेच..डाव नको ऐका सोपा हवा थोडा पेच.!...
माणसाच्या आयुष्याला ..जीवन हि पाण्याची उपमा दिली आहे..पाणी एकाच ठिकाणेजमून राहिले तर .त्याचे गढूळ डबके होते..तसे होऊ ना देता पाण्याने ( पर्यायाने जीवनाने..) निखल झर्या सारखे सदैव वाहत राहावे...त्यातूनच आपल्यातला अजून काही "नवीन गुणाचा" आपल्याला "नवीन" शोध लागेल, नाही का?